Tur Bazar Bhav Today: शेतकरी मित्रांनो, आज दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुरीच्या बाजारात कुठे तेजी, तर कुठे मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे. लातूर बाजार समितीने आजही आपला दबदबा कायम राखला असून, तिथे तुरीला राज्याचा उच्चांकी भाव मिळाला आहे.
आजच्या बाजार अहवालानुसार, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वाधिक ७५९१ रुपये प्रति क्विंटल असा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. विशेष म्हणजे ३३२५ क्विंटलची मोठी आवक होऊनही इथल्या दरात कोणतीही घसरण झालेली नाही. याउलट नांदगाव बाजार समितीत किमान दर थेट २००० रुपयांपर्यंत खाली आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.